विजेच्या कमी-जास्त दाबामुळे वरणगावात पाणीटंचाई ; तातडीने एक्सप्रेस फिडर मंजूर करा ; लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळेंची मागणी
Water Scarcity in Varangaon Due to Voltage Fluctuations; Immediately Sanction an Express Feeder: Demands Elected Council President Sunil Kale वरणगाव (13 एप्रिल 2026) : वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे हतनूर गावठाण येथून वरणगाव पाणीपुरवठा योजनेचे जॅकवेल कठोरा येथे असून वीजपुरवठा हा हतनूर गावठाण फिडरवरून कमी-जास्त दाबाने केला जात असल्याने मोटार पंप हे ट्रिप होऊन बंद पडत आहे त्यामुळे तीन दिवसांपासून वरणगाव शहराला पाणी पुरवठा बंद असल्याने पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. ही समस्या सुटण्यासाठी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे व वरणगावकरांनी थेट कठोरा येथील जॅकवेलवर दोन दिवसांपासून ठिय्या मांडला असून पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तिथंपर्यंत उठणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.
तात्पुरता वीजपुरवठा सुरळीत
वीज वितरण कंपनी कर्मचारी व नगरपरिषद कर्मचारी यांनी तातडीने कठोरा जॅकवेल गाठत दुपारी चार वाजेपासून पाणीपुरवठा योजनेचा वीज प्रवाह खंडित होण्याची समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अधिकारी शैलेश चौधरी, उपकार्यकारी अभियंता एस.एम.पंचभुते, एस.आर.बोदडे, नगरपालिका कर्मचारी, वीजवितरण अधिकारी यांच्या प्रयत्नाने वीजपुरवठा तात्पुरता सुरळीत करण्यात आला मात्र तेव्हा पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न नगरपालिका कर्मचारी मुक्तार खान, निलेश झांबरे यांच्यासह कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.


दरम्यान, एक्सप्रेस फिडर मंजुरीसाठी लढा अधिक तीव्र करणार असल्याचा इशारा यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्ष सुनील काळे यांनी दिला.








