जागतिक होमिओपॅथी दिनानिमित्त रक्तदान शिबिर


Blood Donation Camp on the Occasion of World Homeopathy Day जळगाव (13 एप्रिल 2026) : गोदावरी फाउंडेशन संचलित डॉ.उल्हास पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज व रुग्णालयात ‘जागतिक होमिओपॅथी दिनाचे’ औचित्य साधून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराला विद्यार्थी आणि कर्मचार्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. 24 रक्तदात्यांनी रक्तदान करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले.

यांची होती उपस्थिती
रक्तदान शिबिराचे उद्घाटन गोदावरी फाउंडेशनचे रजिस्ट्रार प्रमोद भिरुड यांच्याहस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना त्यांनी रक्तदानाचे महत्त्व अधोरेखित केले आणि सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल कॉलेजचे कौतुक केले.



यावेळीे प्राचार्य डॉ. पंकज शर्मा सर, डॉ. विपुल साळुंखे, डॉ. भूषण यांच्यासह शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी आणि इंटर्न विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी रक्तपेढीच्या डॉ.स्वाती मिश्रा. रक्तपेढी समन्वयक. लक्ष्मण पाटील, दिनेश भोळे, रुपेश कुलकर्णी, ज्योती खळसे यांनी परिश्रम घेतले.

रक्तदान शिबिराच्या यशस्वी आयोजनाबद्दल गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ.उल्हास पाटील, सचिव डॉ.वर्षा पाटील, सदस्य डॉ.केतकी पाटील, डॉ.वैभव पाटील, डॉ.अनिकेत पाटील यांनी सर्व आयोजक व रक्तदात्यांचे अभिनंदन केले.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !