शिरपूर शहर पोलिसांची मोठी कामगिरी : गावठी कट्टा, जिवंत काडतूसांसह पुण्यातील आरोपी जाळ्यात


Major Breakthrough by Shirpur City Police : Pune-based Accused Nabbed with Country-made Pistol and Live Cartridges शिरपूर (13 एप्रिल 2026) : शिरपूर शहर पोलिसांना संशयीत गावठी कट्टा खरेदी व विक्रीच्या उद्देशाने येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून पुण्यासह शिरपूरातील संशयीतांना बेड्या ठोकल्या. आरोपींच्या ताब्यातून दोन जिवंत काडतूस व कट्टा जप्त करण्यात आला. ही कारवाई शनिवार, 11 एप्रिल रोजी दुपारी 1.45 वाजेच्या सुमारास शिरपूर-शहादा रोडवरील शिंगावे गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर करण्यात आली. पवन दादा कोतवाल (19, काळेपडळ, हडपसर, पुणे) व अक्षय संदीप पाटील (21, भटाणे, ता.शिरपूर, जि.धुळे) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

गोपनीय माहितीवरुन कारवाई
शिरपूर शहर निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना संशयीत गावठी कट्टा खरदेसाठी येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला निर्देश दिल्यानंतर शनिवारी शरपूर-शहादा रोडवरील शिंगावे गावाकडे जाणार्‍या रस्त्यावर आरोपींना अटक करण्यात आली. आरोपींचय ताब्यातून 25 हजार रुपये किंमतीचे गावठी बनावटीचे स्टीलचे पिस्टल (काळ्या फायबर मुठीसह) तसेच दोन हजार रुपये किंमतीचे दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले.



यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, उपनिरीक्षक संदीप दरवडे, डी.बी.पथकातील हवालदार रवींद्र आखडमल, हवालदार अतुल पाटील, कॉन्स्टेबल आरीफ तडवी, योगेश दाभाडे, मनोज महाजन, सोमा ठाकरे, विनोद आखडमल, सचिन वाघ, भटू साळुंके, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, गोविंद कोळी, चालक रवींद्र महाले, विजय पाटील आदींच्या पथकाने केली.











मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !