एक लाखांची लाच भोवली : जळगावच्या शनीपेठ पोलिस ठाण्यातील कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
गणेश वाघ
Bribe of One Lakh Proves Costly : Employee from Jalgaon’s Shanipeth Police Station Caught in ACB Net जळगाव (13 एप्रिल 2026) : एका प्रकरणात गुन्हा दाखल न करण्यासाठी तडजोडीअंती एक लाखांची लाच स्वीकारताना जळगावच्या शनीपेठ पोलिस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल विनोद पितांबर अहिरे यास सोमवारी दुपारी जळगाव एसीबीने अटक केल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
असे आहे लाच प्रकरण
तक्रारदाराच्या मुलाविरुद्ध शनिपेठ पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या अर्जाची चौकशी आरोपी अहिरे यांच्याकडे होती. या प्रकरणात कोणतीही कायदेशीर कारवाई न करता अर्ज निकाली काढण्यासाठी आरोपीने दोन लाख रुपयांची लाच मागितली होती. तक्रारदाराने तत्काळ याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर सोमवार, १३ एप्रिल २०२६ रोजी सापळा रचण्यात आला.


लाच पडताळणीदरम्यान पंचांसमक्ष पुन्हा लाच मागणी स्पष्ट झाल्यानंतर तक्रारदार हे लाचेची रक्कम देण्यासाठी शनिपेठ पोलीस स्टेशन परिसरात गेल्यानंतर आरोपीने पोलीस स्टेशनच्या बाहेरच एक लाखाची रोख रक्कम स्वीकारली व नंतर पथकाने आरोपीला रंगेहाथ पकडले.
यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत नागरे, पोलीस उपनिरीक्षक सुरेश पाटील, संगीता पवार, राकेश दुसाने, सचिन चाटे, अमोल सूर्यवंशी आदींच्या पथकाने यशस्वी केला. तपास पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे करीत आहेत.








