शेवगेतील शाळकरी विद्यार्थ्याचा सर्पदंशाने मृत्यू
बोदवड : तालुक्यातील शेवगे खुर्द येथील शाळकरी विद्यार्थ्याला शाळेत जात असताना सर्पदंश झाल्याने त्याचा मृत्यू ओढवला. सोमवारी पहाटे साडेसहा वाजता ही घटना घडली. अनिकेत शंकर अहिर (10) असे मृत बालकाचे नाव आहे. शाळेत जाण्यासाठी अनिकेत निघाला असताना रस्त्यात त्यास सर्पदंश झाला. घरी येवून त्याने ही घटना आई-वडिलांना सांगताच त्यास तत्काळ गावातील डॉक्टरांकडे नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्याच्या पश्चात आई-वडील, एक भाऊ आणि एक बहीण असा परिवार आहे. बोदवड ग्रामीण रुग्णालयात डॉ.उदय पाटील यांनी शवविच्छेदन केले.