माजी खासदार हरीभाऊ जावळे यांचे निधन
मुंबई : भाजपाचे माजी खासदार व माजी आमदार तथा भाजपाचे जिल्हाध्यक्ष हरीभाऊ माधव जावळे यांचे (60) यांचे मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास मुंबई येथे उपचार सुरू असताना निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते मात्र मंगळवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, मुलगी, सून व नातवंडे असा परीवार आहे. हरीभाऊंच्या अकाली निधनामुळे भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये मोठी शोककळा पसरली आहे.


