जीवन मोराणकर यांची तहसीलदारपदी निवड
जळगाव : राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जळगाव येथील रहिवासी जीवन रवींद्र मोराणकर हे उत्तीर्ण झाले असून त्यांची तहसीलदारपदी निवड झाली आहे. सध्या ते नंदुरबार जिल्हा परीषदेत उपशिक्षणाधिकारी म्हणून कार्यरत असून या आधी त्यांनी विक्रीकर अधिकारी पदाची परीक्षा उत्तीर्ण केली होती व यानंतर एम.पी.एस.सी.ची दुसरी परीक्षा 2018 मध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर त्यात त्यांना उपशिक्षणाधिकारी म्हणून संधी मिळाली होती. शिवाय एम.पी.एस.सी.ची आणखी एक परीक्षा 2019 मध्ये दिली होती. त्यात पदोन्नती मिळाली असून आता त्यांना यात वर्ग- 1 चे पद ‘तहसीलदार’ म्हणून मिळाले आहे. राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचचा निकाल शुक्रवारी सायंकाळी जाहीर झाल्यानंतर मोराणकर यांच्यावर विविध क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. जीवन हे दैनिक ‘लोकमत’चे वरीष्ठ उपसंपादक रवींद्र मोराणकर यांचे चिरंजीव आहेत.
