कागद्याच्या लगद्यापासून ‘वृक्ष गणेशाची’ प्रतिकृती
भुसावळच्या संस्कृती फाऊंडेशन साकारतेय पूजेसाठी मातीची पर्यावरणपूरक मूर्ती
भुसावळ- शहरातील संस्कृती फाऊंडेशनने यंदाच्याही गणेशोत्सवात कागदाच्या लगद्यापासून गणेशमूर्ती साकारण्यास सुरवात केली असून पूजेसाठी लहान आकाराची मातीपासून तयार केलेली मूर्ती बसविण्यात येणार आहे. या पर्यावरणपूरक अभियानास गेल्या चार वर्षांपासून सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील डॉ.शामाप्रसाद मुखर्जी उद्यानात या गणेशाची स्थापना केली जाणार आहे. संस्कृती फाउंडेशन गेल्या चार वर्षांपासून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पुढाकार घेऊन वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करीत आहे. गतवर्षी संस्कृती फाउंडेशनतर्फे कागदाच्या लगद्यापासून साकारण्यात आलेली 10 फुटाची मूर्ती स्थापीत केली होती. यंदा वृक्षारोपणाचे महत्व नागरीकांना पटवून देण्यासाठी 12 फुटाची वृत्तपत्रापासून साकारण्यात आलेल्या ‘वृक्ष गणेशाची’ प्रतिकृती उद्यानात साकारण्यात येणार आहे. यासाठी त्यांनी वृत्तपत्राच्या कागदाचा वापर केला आहे. यंदा सुद्धा भुसावळकरांना संस्कृती फाउंडेशनचा आगळा वेगळा गणपती बघायला मिळणार आहे. गणपती संपूर्ण वृत्तपत्रापासून पासून बविण्यात आलेला असून सुमारे 15 किलो वृत्तपत्र यासाठी वापरण्यात आले आहे.