बिबट्याने पाडला गायीचा फडशा


रावेर- तालुक्यातील सहस्त्रलिंग गावानजीक बिबट्याने गायीचा फडशा पाडल्याची घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाला माहिती कळताच मृत गायीचा पंचनामा करण्यात आला. सत्तार गुलशन तडवी रा.सहस्त्रलिंग, ता.रावेर हे आपल्या गायींचा कळप घेऊन जंगलात चराईसाठी गेल्यानंतर घरी आल्यानंतर त्यांना एक गायी कमी आढळली. त्यांनी गायीच्या शोधार्थ जंगल गाठल्यानंतर कंपार्टमेंट 18 मध्ये ही गाय मृत आढली होती. याबाबतची माहिती वन विभागाला कळवताच वनक्षेत्रपाल मुकेश महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल संजय भदाणे, वनरक्षक राणी कोळी यांनी घटनास्थळी भेट दिली. मृत गायीच्या मानेवर तसेच पाठीवर हल्ला झाल्याने हा हल्ला बिबट्याने केल्याचा प्राथमिक अंदाज आहे.


कॉपी करू नका.