भुसावळात संगणक परीचालकांचे लाक्षणिक धरणे आंदोलन


भुसावळ : राज्यातील सर्व संगणक परीचालकांना महाराष्ट्र आय.टी.महामंडळाकडून संगणक परीचालक म्हणून नियुक्ती द्यावी, पंचायत समिती व जिल्हा परीषद स्तरावरील संगणक परीचालकांना नियुक्ती देण्यासाठी राज्य मंत्री मंडळाने मंजुरी दिल्याने त्याबाबत शासनाने निर्णय जाहीर करून आय.टी.महामंडळानेही परवानगी देण्यासह अन्य न्याय मागण्यांसाठी भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयासमोर भुसावळ तालुका संगणक परीचालक संघटनेतर्फे गुरुवारी लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले.

यांचा आंदोलनात सहभाग
या धरणे आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष राजू मोरे, उपाध्यक्ष योगीता खाचणे, सचिव ओंकार पाटील, सदस्य रमेश चौधरी, अतुल पाटील, राजेश पाटील, मुकेश सपकाळे, राजेंद्र सरोदे, हेमंत बोदर, भूषण सातपुते, सुमंत नेहते, विजय पाटील, नवीन वाघमारे, हर्षल येवले, मयुर गोलांडे, बाळू बावस्कर, अनिल सनांसे, मीनाक्षी मोरेस्कर, लता कोळी, कविता मिस्तरी, स्नेहा वारके, भावना धांडे, शुभांगी झांबरे, नूरजहाँ तडवी, मोनाली ढाके, प्रगती चौधरी, रींकु निकम, सागर पाटील आदी सहभागी झाले आहेत.


कॉपी करू नका.