जामठीत दुकान फोडले : तिघे आरोपी जाळ्यात


जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

बोदवड : तालुक्यातील जामठी येथे किराणा दुकान फोडल्याची घटना काही दिवसांपूर्वी होती. या प्रकरणी बोदवड पोलिसात गुरनं.98/2019, भादवि कलम 457, 380 अन्वये गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास सुरू असताना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे बोदवड शहरातील चहा विक्रेता गणेश काशिनाथ पवारसह अन्य दोघांना अटक केली. आरोपींच्या ताब्यातून 26 हजारांची रोकड जप्त करण्यात आली असून आरोपींना बोदवड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

यांच्या पथकाने आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जामठी येथील काशीनाथ गुलाबचंद तेली (57, जामठी, ता.बोदवड) यांच्या किराणा दुकानातून तुपाचे डबे, काजू, बदाम तसेच रोकड मिळून एक लाख 19 हजारांच्या साहित्यावर डल्ला मारला होता. या प्रकरणी बोदवड पोलिसांसह जळगाव स्थानिक गुन्हे शाखेकडूनही तपास सुरू होता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बी.जी.रोहम यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय राजेंद्र पाटील, अशोक महाजन, हवालदार नारायण पाटील, रामचंद्र बोरसे, नाईक मनोज दुसाने, दीपक पाटील, प्रवीण हिवराळे, संदीप सावळे, महेश पाटील आदींच्या पथकाने तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या.


कॉपी करू नका.