बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांची अखेर नियंत्रण कक्षात बदली


भुसावळ : भुसावळ बाजारपेठ पोलिस ठाण्यातील गोपनीय विभागाचा कर्मचारी छोटू माणिकराव वैद्य (खोटे नगर, जळगाव) यास बुधवारी रात्री साडेनऊ वाजता 40 हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली होती. हवालदार वैद्य याने लाच प्रकरणात पोलिस निरीक्षकांच्या सांगण्यावरून लाच मागितल्याचे तक्रारदाराला सांगितल्याने जिल्ह्यातील पोलिस दलात खळबळ उडाली होती. या अनुषंगाने बाजारपेठ निरीक्षक देविदास पवार यांची शनिवारी दुपारी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. याबाबतचे जिल्हा पोलिस अधीक्षकांचे आदेश तीन वाजेच्या सुमारास प्राप्त झाले.

निरीक्षक म्हणाले बदलीसाठी अर्ज
बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक देविदास पवार म्हणाले की, आपणच नियंत्रण कक्षात बदलीसाठी पोलिस अधीक्षकांना अर्ज केला होता त्यामुळे आपली बदली झाल्याचे ते म्हणाले.


कॉपी करू नका.