मोटारसायकल चोरटे जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
जळगाव : वेगवेगळ्या कारवायांमध्ये दुचाकी चोरट्यांच्या जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुसक्या आवळल्या.
एमआयडीसी हद्दीतून लांबवली दुचाकी
स्थानिक गुन्हे हवालदार शरद भालेराव व रामकृष्ण पाटील हे जुन्या बी.जे मार्केटमध्ये पेट्रोलिंग करताना एक संशयीत वेगाने दुचाकी चालवत असताना त्यास थांबवले मात्र तो न थांबल्याने एएसआय अशोक महाजन, राजेंद्र पाटील, गफूर तडवी, महेश पाटील यांना कळवण्यात आल्यानंतर स्टेडियम, स्वातंत्र चौक, स्टेशन रोड भागात नाकाबंदी करून राजेश अशोक कोळी (20, रा.जोशी पेठ, जळगाव) यास ताब्यात घेण्यात आले. आरोपीने एमआयडीसी हद्दीतील कंजरवाडा परीसरातून दुचाकी लांबवल्याचे निष्पन्न झाले.
दुसरा दुचाकी चोरही जाळ्यात
जळगाव स्थानिक गुन्हे शाखेतील विजय शामराव पाटील व सचिन महाजन हे गस्तीवर असताना त्यांनी एएसआय अशोक महाजन, सुनील दामोदरे, विलास पाटील, इद्रिस पठाण, प्रकाश महाजन, भगवान पाटील, नंदलाल पाटील यांच्या मदतीने तांबापुरा भागात नाकाबंदी करून लक्ष्मण संतोष जाधव (23, रा.तांबापूरा, जळगाव) यास अटक केली. आरोपीने औरंगाबाद जिल्ह्यातील चिखल ठाणा पोलीस स्टेशन हद्दीतुन दुचाकी लांबवल्याची कबुली दिली. आरोपीला चिखल ठाणा पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.