बोदवड-नाडगाव रस्त्यावर दुचाकी अपघातात दोघे गंभीर


बोदवड- नाडगाव-बोदवड रस्त्यावरील ग्रीन लाईट हॉटेल समोर दोन भरधाव दुचाकी समोरा-समोर आदळून झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी तर दोघे किरकोळ जखमी झाल्याची घटना 31 रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. या अपघात संजय पाटील (भानखेडा) व प्रमोद दिवनसिंग पाटील (नांदगाव) हे दोघे गंभीर जखमी झाले तर महेंद्र गोकुळ पाटील (भानखेडा) यांच्यासह जगदीश संतोष पाटील (भानखेडा) यांना किरकोळ जखमा झाला. बोदवड ग्रामीण रुग्णालयात प्रथोमोपचार करून जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. बोदवड पोलिसात मात्र अपघाताची नोंद नसल्याचे सांगण्यात आले.


कॉपी करू नका.