नापिकीमुळे थोरगव्हाणच्या शेतकर्याने मृत्यूला कवटाळले
यावल- तालुक्यातील थोरगव्हाण येथील सुभाष रामदास पाटील (40) या शेतकर्याने शेतात काहीतरी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवली. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, मुलगा असा परीवार आहे. शेतीतील नापिकीमुळे वारंवार त्यांनी आत्महत्येचा प्रयत्नही यापूर्वी तीन वेळा केल्याची माहिती असून कर्ज डोईजड झाल्याने त्यांनी सोमवार, 2 सप्टेंबर रोजी विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली.याबाबत यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. यावल ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले तर मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.