नंदुरबारात डी.फार्मसी कॉलेजच्या प्राचार्यांची आत्महत्या
शैक्षणिक क्षेत्रात उडाली खळबळ : जिजामाता फार्मसी कॉलेजमधील घटना
नंदुरबार : शहराजील जिजामाता फार्मसी कॉलेजचे प्राचार्य रवींद्र शामराव चौधरी (56, लक्ष्मी नगर, नंदुरबार) यांनी कॉलेजमध्ये गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. याबाबत उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल तुषार प्रभाकर कुलकर्णी (40, नंदुरबार) यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. सूत्रांच्या माहितीनुसार, कॉलेजच्या रूम क्रमांक दोनमधील छताच्या हुकला नॉयलोन दोरीने गळफास घेत चौधरी यांनी आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण नेमके कळू शकलेले नाही. पोलिस निरीक्षक बी.एस.भापकर व सहकार्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
