तळोद्यात गावठी पिस्तुल व जिवंत काडतुसासह एक जाळ्यात


नंदुरबार : तळोदा शहरातील चिनोदा चौफुली परीसरात गावठी बनावटीचे पिस्तूल व दोन जिवंत काडतुस विक्रीच्या प्रयत्नातील एकास पोलिसांनी अटक केली. धर्मा धना वंजारी (59, रा.मंदाणे, ता.शहादा) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला गुरुवारी 15 ऑक्टोबर रोजी सकाळी 9.15 वाजता गुप्त बातमीदारमार्फत माहिती मिळाली की, एक जण संशयीत चिनोदा चौफुलीवर पिस्तुलसह फिरत असल्रूाने पोलिसांनी चौकशी केल्यानंतर संशयीतास ताब्यात घेतले असता त्याच्या ताब्यातून गावठी बनावटीचे 7 एम. एम.चे पिस्तूल तसेच दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !