भुसावळ बियाणी मिलिटरी स्कूल मध्ये शिक्षकदिन उत्साहात
भुसावळ : जामनेर रोडवरील बियाणी मिलिटरी स्कूलमध्ये शिक्षकदिन उत्साहात साजरा करण्यात आला. द्वीपप्रज्वल पंचायत समितीचे गटशिक्षण अधिकारी महेंद्र धीमते यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुण्या म्हणून प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे होत्या.
यांची होती उपस्थिती
यावेळी बियाणी ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी, सचिव संगीता बियाणी, स्मिता बियाणी, संजय लाहोटी, सु.ग.टेमानी विद्यालयाचे प्राचार्य मनोज माहेश्वरी, प्रवीण भराडीया, राजू पारीख, डॉ संगीता चांडक, राधा झंवर, दीपक धांडे, गोपाळ ठाकूर, प्रिंसीपल डी.एम.पाटील, भारती राठी, किरण पारीख, रीतिका हेडा आदी उपस्थित होत्या. शिक्षकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. बियाणी ग्रुपतर्फे सर्व शिक्षकांना भेटवस्तू देऊन सन्मानीत करण्यात आले. पर्यवेक्षक म्हणून भारती राठी, रीतिका हेडा होत्या. सूत्रसंचलन प्रतीक तिकोटे, संगीता नायक यांनी तर आभार प्राचार्य डी.एम.पाटील यांनी केले.