नंदनगरीत डीजेचा दणदणाट भोवला : सहा पदाधिकार्‍यांविरुद्ध गुन्हे


नंदुरबार : नंदनगरीत डीजेचा दणदणाट करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी सहा पदाधिकार्‍यांविरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल केल्याने शहरात खळबळ उडाली आहे. शहरातील महात्मा गांधी पुतळ्याजवळ तसेच दोशाह ताकिया भागात डीजे लावून मोठ्या प्रमाणावर आवाज करून सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी सुमित राजपाल (सिंधी कॉलनी), खंडू भाईदास माळी, भूषण गोरख गवळी (माळीवाडा), विक्की बालाजी चौधरी, किरण राजेंद्र बडगुजर (अमर कॉलनी), संजय उत्तम मराठे (सिद्धीविनायक चौक, नंदुरबार) यांच्याविरुद्ध पर्यावरण संरक्षण अधिनियम तसेच अन्य कायद्यान्वये गुन्हा दाखल झाल्याने शहरातील सार्वजनिक उत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांसह डीजे चालकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.


कॉपी करू नका.