भुसावळात तृतीयपंथीयांना गणरायाच्या आरतीचा मान
शहरातील संस्कृती फाउंडेशन फाउंडेशनचा पर्यावरण पूरक गणेशोत्सव ; कागदाच्या लगद्यापासून साकारले ‘श्री’
भुसावळ- शहरात संस्कृती फाउंडेशनतर्फे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात सलग दुसर्या वर्षी पर्यावरण पूरक गणरायाची स्थापना करण्यात आली आहे गणपतीची प्रतिकृती संपूर्ण कागद्याच्या लगद्यापासून वृक्ष गणेशाच्या रुपात साकारण्यात आली. संस्कृती फाउंडेशने समाजातील उपेक्षित समजल्या जाणार्या तृतीयपंथीयांना गणरायाच्या आरतीचा मान देऊन समाजात नवीन आदर्श निर्माण केला. देवाच्या भक्तीचा अधिकार सर्वांना समान आहे, गणरायाच्या आरतीचा मान हा फक्त स्त्री आणि पुरुषांनाच नसून तृतीयपंथीयांना देखील आहे, असा संदेश यानिमित्ताने समाजात गेला आहे. तृतीयपंथी देखील आपल्यातीलच एक घटक आहे त्याला आपण आपल्यामध्ये सामावून घेतले पाहिजे यासाठी हा उपक्रम संस्थेने हाती घेतला आहे.
तृतीयपंथीदेखील समाजाचा घटक
भुसावळ येथील येल्लमाँ माता भक्त तृतीयपंथी गौतम भगत व तसेच भुसावळ शहरातील विविध श्रेत्रातील मान्यवर डॉ.संजय नेहते, डॉ.नीलिमा नेहते व अॅड. बोधराज चौधरी व अजित गायकवाड यांना आरतीचा मान देण्यात आला. त्यांनी संस्थेचे आदर्श गणेशोत्सवाचे कौतुक केले. तृतीयपंथी देखील समाजाचा एक घटक आहे आणि त्यांना सुद्धा पूजा विधी करण्याचा अधिकार आहे, असे प्रतिपादन यावेळी डॉ.संजय नेहते व अॅड.बोधराज चौधरी ह्यांनी केले.
इकोफ्रेंडली बाप्पाच्या दर्शनासाठी गर्दी
संस्कृती फाउंडेशनच्या इकोफ्रेंडली बाप्पांच्या दर्शनासाठी पर्यावरण प्रेमी भक्तांची गर्दी जमत आहे. गणरायाचे आगमनदेखील पारंपरीक पध्दतीने झाले असून ह्यात सुमारे 15 किलो वृत्तपत्राचा वापर करून ‘वृक्ष गणेशाची’ प्रतिकृती साकारण्यात आली. संस्कृती फाउंडेशन गेल्या चार वर्षांपासून पर्यावरण पूरक गणेशोत्सव तसेच समाजात विविध उपक्रम राबवून समाजात आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहे. गणरायाचे विसर्जन हे माधवाश्रम समोरील महाराणा प्रताप चौकात आमदार संजय सावकारे व रजनी सावकारे यांच्या हस्ते कुंडात होणार असून ह्यामध्ये भव्य जनजागृतीपर दिंडीचे आयोजन संस्कृती फाउंडेशनतर्फे करण्यात येणार आहे आहे.
व्यसनमुक्ती व पर्यावरण संवर्धनाचे संदेश
उद्यानात येणार्या भाविकांना व्यसनमुक्ती व पर्यावरण संवर्धनाचे संदेश दिला जात असून ग्रामीण लोकजीवनाचे दर्शन होण्यासाठी सजीव देखावा साकारण्यात आला आहे. संस्कृती फाउंडेशन तर्फे डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात व्यसनमुक्ती व पर्यावरण सनवर्धनाच्या संदेशाचे भित्तीचित्रे लावण्यात आली आहेत. संदेश पूर्णपणे बोलके असून असून त्यातून भक्तगण बोध घेत आहेत. आरतीच्या वेळेस येणार्या सर्व भाविक भक्तांना वृक्षारोपनासाठी ‘सीड बॉल’ भेट दिले जात आहे.
यांचे यशस्वीतेसाठी परीश्रम
गणेशोत्सवासाठी अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, उपाध्यक्ष अशफाक तडवी, कोषाध्यक्ष अजीत गायकवाड, पवन कोळी, भाग्यश्री बाविस्कर, पराग चौधरी, संस्कार मालविया, हर्षवर्धन बाविस्कर, तुषार गोसावी, मानसी खडके, माधुरी विसपुते, संकेत सोनार, नम्रता चांडक, सीमा अडळकर, मंगेश भावे, विद्या भावे, माधुरी राजपूत, चेतन गायकवाड, स्वरा राजपूत, मनोहर झांबरे, अजय पाटील, संजय राजपूत सर, निलेश कोळी, लकी कोळी, कोमल बोरणारे, अर्सलान तडवी, अरहान तडवी इत्यादी कार्यकर्ते परीश्रम घेत आहेत.