सुझलॉनचा निष्काळजीपणा : निष्पाप बालकाचा गेला बळी
नंदुरबार : रांजणगाव शिवारातील सुझलोन पवन ऊर्जा कंपनीच्या टॉवर जवळ खेळताना सुदीप संजय सूर्यवंशी या बालकाचा शॉक लागून मृत्यू झाला. या टॉवर जवळ एक ट्रान्सफार्मर असून त्याला संरक्षण जाळी बसवण्यात आली आहे. या जाळीचे गेट उघडे होते त्यामुळे खेळता-खेळता तो बालक अनाधावाने ट्रान्सफार्मरजवळ गेला. त्यावेळी त्याचा हात ट्रांसफार्मर च्या केबलला लागल्याने त्याला विजेचा जोरात धक्का बसला. त्यात तो 60 टक्क्यांहून अधिक भाजला गेला. उपचारासाठी त्याला तातडीने नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी सुरत येथे पाठवण्याचा सल्ला दिला. तेथे उपचार सुरू असताना सुदीप सूर्यवंशी या बालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे सुझलोन कंपनीच्या टॉवर परिसरातील सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.







