भडगावातील 22 वर्षीय विवाहितेची आत्महत्या
भडगाव : शहरातील यशवंतनगर भागातील 22 वर्षीय विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना 5 रोजी रात्री 11.30 ते 12 वाजेच्या सुमारास घडली. आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. रोहिणी शेखर पाटील (22) असे मृत विवाहितेचे नाव आहे. या विवाहितेने घराच्या बेडरुममध्ये सिलींग फॅनला नॉयलॉनच्या दोरीने गळफास घेतला. पोलिस पाटील भूषण रमेश पाटील यांनी दिलेल्या खबरीवरुन भडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस निरीक्षक धनंजय येरुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.