भुसावळ जंक्शन रेल्वे स्थानकाला आयएसओ मानांकन
विभागातील 12 स्थानकांचा मानांकनात समावेश
भुसावळ- रेल्वेचे जंक्शन असलेल्या भुसावळ शहरासह विभागातील 12 रेल्वे स्थानकांनी पर्यावरण संवर्धनासाठी भरीव उपाययोजना केल्याने या स्थानकांना आयएसओ मानांकन प्रमाणपत्र देण्यात आले आहे. भुसावळ जंक्शनसह जळगाव, नाशिकरोड, मनमाड, चाळीसगाव, बर्हाणपूर, खंडवा, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा आणि अमरावती या रेल्वे स्थानकांना आयएसओ 14001, 2015 हे प्रमाणपत्र मिळाले. रेल्वे स्थानकाची सफाई, पर्यावरण व्यवस्थापनासाठी आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. डीआरएम विवेककुमार गुप्ता, एडीआरएम मनोज सिन्हा यांनी मार्गदर्शन केले.