छडवेल कोर्डे येथे शेतकरी कुटुंबावर हल्ला : दोघांविरुद्ध गुन्हा


नंदुरबार : खळ्यात बैल शिरल्याच्या कारणावरून तालुक्यातील छडवेल कोर्डे येथील शेतकरी कुटुंबावर दोघांनी हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
छडवेल येथील कमलेश विजय बेडसे यांचा बैल खळ्यात घुसला. या क्षुल्लक कारणावरुन गावातीलच महेंद्र खुशाल बेडसे व शेखर खुशाल बेडसे या दोघांनी कमलेश बेडसे यांच्या घरी येत धुमाकूळ घातला. तुझा बैल आमच्या खळ्यात घुसल्याने त्याला आम्ही मारून टाकू अशी धमकी दिली. यापुढे बैल बांधून ठेऊ, अशी विनंती कमलेश बेडसे यांनी केली. त्याचे समाधान न झाल्याने महेंद्र बेडसे व शेखर बेडसे यांनी रागाच्या भरात शिवीगाळ केली. तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत त्या दोघांनी कमलेश बेडसे वर हल्ला केला. ते तेवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी कमलेशच्या वृद्ध आजी-आजोबाला देखील थप्पड मारत ढकलून दिले, गावातील काशिनाथ सोनवणे, दीपक बेडसे व मयुर साळुंखे यांनी भांडण सोडवायला मदत केली. अन्यथा आम्हाला ठार मारले असते, अशी फिर्याद कमलेश बेडसे यांनी निजामपूर पोलिस ठाण्यात दिली आहे, त्यानुसार महेंद्र बेडसे ,खुशाल बेडसे या दोघांविरुद्ध भादवि कलम 452, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहा.पोलिस निरीक्षक सचिन शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल राजाराम बहिरम हे पुढील तपास करीत आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !