भुसावळातील शंभू राजे ग्रुपचा आगळा-वेगळा गणेशोत्सव


अनावश्यक खर्चाला फाटा देत मदत पेटीतील निधी देणार पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना

भुसावळ : शहरातील शंभू राजे ग्रुपतर्फे यंदाच्या गणेशोत्सवात अनावश्यक खर्चाला फाटा देण्यात आला असून जमलेला निधी पश्‍चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना देण्याचा सकारात्मक निर्णय घेण्यात आला आहे. शंभू राजे ग्रुपतर्फे श्रींची विधीवत स्थापना करण्यात आल्यानंतर दर्शनासाठी आलेल्या भाविकांपुढे मदतपेटी ठेवण्यात आली असून या मदत निधीतून जमा झालेली रक्कम पूरग्रस्तांना देण्यात येणार आहे. 2014 मध्ये माळीण गावावर दरड कोसळल्यानंतर मंडळाने सामाजिक बांधीलकी जपत मदतीचा हातही पुढे होता.

मदतीचा धनादेश प्रांताधिकार्‍यांना देणार
मदत निधी जमा करण्यासाठी मंडळापुढे मदतपेटी ठेवण्यात आली असून स्वच्छेने भाविक त्यात मदत टाकू शकतात शिवाय शहरातील सामाजिक संस्था, डॉक्टर्स, वकील संघ, विविध व्यापारी संघ यांनादेखील मदतीसाठी आवाहनपर पत्र देण्यात येणार असून मदतीचा धनादेश सहकार्य करणार्‍या सर्व मंडळांच्या उपस्थितीत प्रांताधिकार्‍यांना सोपवला जाईल, असे मंडळाचे शंभूराजे ग्रुपचे संस्थापक तसेच माजी नगरसेवक राजेंद्र आवटे यांनी सांगितले. उत्सव यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी व सर्व सदस्य परीश्रम घेत आहेत.


कॉपी करू नका.