भुसावळात जुगाराचा डाव उधळला : आठ आरोपी जाळ्यात
चार हजार 350 रुपयांची रोकड जप्त : बाजारपेठ पोलिसांची कारवाई
भुसावळ : शहरातील सिंधी कॉलनी भागातील नवजीवन सोसायटीतील एस.एस.ग्रुप मंडळाच्या स्टेजमागे झन्ना-मन्ना नावाचा जुगाराचा डाव रंगात आला असताना बाजारपेठ पोलिसांनी छापा टाकत आठ जुगार्यांची मुसक्या आवळल्या. रविवारी पहाटे तीन वाजेच्या सुमारास टाकण्यात आलेल्या धाडीत पत्त्यांच्या कॅटसह चार हजार 350 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली.
यांच्या पथकाने केली कारवाई
जिल्हा पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शंकर पाटील, बंटी कापडणे, कृष्णा देशमुख, करतारसिंग परदेशी, प्रशांत चव्हाण, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी आदींनी ही कारवाई केली.