मुंबईहून आलेल्या ट्रक चालकाला नंदुरबारात लुटले


दमदाटी व मारहाण करीत दहा हजाराची रोकड लांबविली

नंदुरबार : रेल्वे केबल माल घेऊन मुंबईहून आलेल्या ट्रक चालकाला दमदाटी करून तिघांनी जबरीने 10 हजारांची रोकड चोरून नेल्याची घटना नंदुरबार शहरात घडली. याप्रकरणी तिघांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. मुंबई येथील मोहम्मद बाबर अली मोहम्मद अमिरुल हे ट्रक (क्र.एम.एच.43 वाय.5031) मध्ये रेल्वे केबल घेऊन नंदुरबारला आले होते. ट्रकमधील केबल खाली करण्यासाठी नंदुरबारात ते रेल्वे ठेकेदाराची वाट पाहत उभे होते. यावेळी रात्री साडेनऊ वाजता दरम्यान आलेल्या तिघांनी ट्रक चालकास दमदाटी करीत मारहाण करून जबरीने खिशातून दहा हजार रुपयांची रोकड काढून घेत पसार झाले. याबाबत ट्रक चालक मो.बाबर अली मोहम्मद अमिरुल यांनी नंदुरबार शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लालू उर्फ लालचंद दाजू खुर्‍हाडे (रा.भोणे फाटा), फारुक शेख पिंजारी (रा.संगम टेकडी), प्रमोद बाजीराव पाटील (रा.रेल्वे बॅरेक, चोपडा) या तिघांविरुद्ध भादंवि कलम 392, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील हे करीत असून संशयितांना अटक करण्यात आली आहे.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !