सी.सी.आय.डी ट्रस्ट राष्ट्रीय महासचिवपदी राजेंद्र निकम


जळगाव- कंट्रोल क्राईम अँड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव ट्रस्टच्या राष्ट्रीय महासचिवपदी राजेंद्र सुकलाल निकम यांची निवड करण्यात आली. कंट्रोल क्राईम अँड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव ट्रस्टचे राष्ट्रीय संस्थापक, अध्यक्ष अजय कुमार रजपूत तसेच ट्रस्ट चे राष्ट्रीय सचिव सत्यम श्रीवास्तव यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.

यांची होती उपस्थिती
यावेळी संगमनेर तालुका अधिकारी भारत रेघाटे, जळगाव तालुका ऑफीसर अक्षय परदेशी, दीपक सूर्यवंशी, विशाल मोरे, मथुरा तसेच मध्यप्रदेश उत्तरप्रदेश मधील कंट्रोल क्राईम अँण्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव्ह ट्रस्टचे पदाधिकारी हजर होते. या निवडीमुळे निकम यांच सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. कंट्रोल क्राईम अँण्ड इन्फॉर्मेशन डिटेक्टिव्ह ट्रस्ट हे संपूर्ण भारतातील गुन्हेगारी व भ्रष्टाचार मुक्त भारत यासाठी कार्यरत व सरकार मान्य ट्रस्ट आहे. निकम यांच्या निवडीने संपूर्ण महाराष्ट्रातील गुन्हेगारी व भ्रष्टाचाराला आळा बसेल , असा विश्वास व्यक्त होत आहे.


कॉपी करू नका.