भुसावळ पालिकेतील नूतन मुख्याधिकार्यांनी स्वीकारला पदभार
मूलभूत समस्या सोडवण्यावर भर -करुणा डहाळे
भुसावळ- भुसावळ पालिकेचे मुख्याधिकारी रोहिदास दोरकुळकर यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागेवर नाशिक विभागीय आयुक्त कार्यालयातील सहाय्यक संचालक करुणा डहाळे यांची बदली झाली होती. बदलीनंतर मंगळवारी त्यांनी दुपारी पालिकेत पदभार स्वीकारला. याप्रसंगी नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकूर यांनी त्यांचे स्वागत केले. पदभारानंतर डहाळे यांनी अधिकार्यांसोबत शहराची पाहणी करीत समस्या जाणून घेतल्या. शहरातील मूलभूत समस्या सोडवण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.