टेकफेस्टच्या मानांकनात गाडगेबाबा अव्वल
तांत्रिक कौशल्य आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध -डॉ.आर.पी.सिंह
भुसावळ- आयआयटी मुंबईतर्फे आयोजित भारतातील सर्वात मोठी रोबोट कॉम्बॅट ‘टेकफेस्ट’ स्पर्धेत भुसावळच्या श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या संघाला आयआयटीने नेमलेल्या आंतरराष्ट्रीय परीक्षकांनी प्रथम मानांकन देऊन गौरवल्यानंतर बुधवार, 11 सप्टेंबर रोजी महाविद्यालयात सहभागी संघाचा जंगी सत्कार करण्यात आला.
यांनी केला गौरव
हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव मधूलता शर्मा, कोषाध्यक्ष अॅड.एम.डी.तिवारी, रमेश नागराणी, सत्यनारायण गोडयाले, पंकज संड व समस्त पदाधिकार्यांनी विद्यार्थ्यांचा गौरव केला. पुष्पेंद्र सिंह पटेल, अविनाश बनसोडे, अक्षय भंगाळे, अतिश यादव, परेश पाटिल, तुषार बर्हाटे, सौरभ मित्रा, शुभम सनांन्से, जुड गावंडे यांचा सत्कार महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.पी.सिंह, अॅकडमीक डीन डॉ.राहुल बारजिभे, प्रा.अविनाश पाटील, प्रा.गिरीश भोळे, प्रा. गरीश सोनवणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
तांत्रिक कौशल्य आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध -डॉ. आर.पी. सिंह
आशिया खंडात इंजिनिअरिंग महाविद्यालयांसाठी मानाची मानली जाणार्या ‘आयआयटी टेकफेस्ट’मध्ये वर्षभर तगड्या स्पर्धकांना आव्हान देत, तांत्रिक कौशल्य आंतरराष्ट्रीय पातळीवर सिद्ध केले आहे. भुसावळच्या श्री संत गाडगेबाबा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा सुवर्ण कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावरही दबदबा कायम राखला, असे गौरवोद्गार डॉ.आर.पी.सिंह काढले.
यंदा पुन्हा भुसावळचा झेंडा फडकवू
आशिया खंडातील सर्वात मोठा टेक्निकल फेस्टिव्हल अशी ओळख असलेल्या आयआयटी ’टेकफेस्ट’चं बिगुल वाजले असून यंदा 3 ते 5 जानेवारीदरम्यान आयआयटी मुंबईच्या कॅम्पसमध्ये टेकफेस्ट रंगणार आहे. गतवर्षा प्रमाणे अव्वल ठरायचेच या ध्येयाने दोन महिन्यांपासून तहान-भूक विसरुन केलेल्या प्रयत्नांच्या जोरावर ‘आयआयटी टेकफेस्ट’मध्ये पुन्हा एकदा भुसावळाचा झेंडा फडकवू, असा विश्वास संघ नायक अविनाश बनसोडे याने दाखवला.