श्री क्षेत्र मनुदेवी येथे बुडाल्याने जळगावच्या तरुणाचा मृत्यू


यावल- तालुक्यातील श्री क्षेत्र मनुदेवी येथील तलावात अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाचा बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजता घडली. अशोक गोपाल सोनवणे (32, तुकाराम वाडी, पीपल्स बँकेसमोर, जळगाव) असे मयताचे नाव आहे. स्वयंपाकाचे काम करून कुटुंबाचा रहाटगाडा ओढणारे सोनवणे हे मंगळवारी पर्यटनासाठी श्री क्षेत्र मनुदेवी येथे दुचाकीने आले होते. दुपारी दोन वाजता ते तलावात अंघोळीसाठी उतरताच त्यांचा पाय निसटल्याने त्यांचा बुडाल्याने मृत्यू झाला. मित्रांनी आरडा-ओरड करून त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला मात्र यश आले नाही. तत्पूर्वी जिल्हा रुग्णालयात सोनवणे यांना आणलयानंतर वैद्यकीय अधिकारी डॉ.कळसकर यांनी मृत घोषित केले. मृताच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, बहीण आणि दोन वर्षाचा मुलगा असा परीवार आहे. दरम्यान, जळगाव शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.


कॉपी करू नका.