जळगावचे आमदार सुरेश मामा भोळे अपघातात किरकोळ जखमी


दुचाकी घसरली : रींगरोडवर किरकोळ अपघात

जळगाव – जळगावचे आमदार सुरेश मामा भोळे यांची दुचाकी स्लीप झाल्याने ते किरकोळ जखमी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास रींग रोडवर घडली. बहिणाबाई उद्यानाकडून घराकडे जात असतांना रस्त्याच्या चुकीच्या बाजून येणार्‍या चारचाकीपासुन स्वत:ला वाचवण्याच्या प्रयत्नात दुचाकी स्लिप होऊन झालेल्या अपघातात आमदार सुरेश भोळे जखमी झाले. आमदार सुरेश भोळे हे त्यांच्या ज्युपिटर या दुचाकीने गुरुवारी सकाळी काम आटोपुन बहिणाबाई उद्यानाकडून निवासस्थानाकडे परतत होते. यावेळी त्यांना एकाने हात दिला. त्याला एक हातून उंचावुन प्रतिसाद देत असताना चुकीच्या बाजूने अचानक समोरून चारचाकी आली. चारचाकीला बघून आमदार भोळे यांनी दुचाकीचा ब्रेक दाबला, ती स्लीप झाली व आमदार भोळे दुचाकीवरून खाली पडले. अपघातानंतर त्यांनी तत्काळ चारचाकी वाहन बोलावत रुग्णालय गाठले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सुदर्शन डायग्नोसिस सेंटर या ठिकाणी त्यांनी सिटीस्कॅन ही करून घेतला. अपघातात आमदार भोळे यांना डाव्या डोळ्याच्या वर दुखापत झाली असून शरीराला मुक्कामार लागला आहे. अपघाताची माहिती मिळताच कार्यकर्त्यांसह पदाधिकार्‍यांनी सुदर्शन डायग्नोसिस सेंटर गाठले व आमदार भोळेंची भेट घेतली. त्यानंतर आमदार भोळे घराकडे रवाना झाले.


कॉपी करू नका.