खडकी अपघातात मरण पावलेल्या आदिवासी मजुरांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाखांची मदत


जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळजवळ खडकी येथे मजुरांच्या वाहनाला अपघात होऊन सहा व्यक्ती मृत्युमुखी पडल्या होत्या. त्यात 5 महिलांचा समावेश आहे. या मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपये मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले. मरण पावलेले मजूर हे आदिवासी असून अतिशय दुर्गम अशा धडगाव तालुक्यातील आहेत. याशिवाय या अपघातात गंभीर व किरकोळ जखमी झालेल्या सर्वांवर उपचार सुरू असून ते देखील शासनाच्या खर्चानेच करण्यात येतील असेही मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले आहेत. आज या घटनेची माहिती कळताच मुख्यमंत्र्यांनी पालकमंत्री के.सी. पाडवी तसेच जिल्हा प्रशासनाकडून याची माहिती घेत संपूर्ण मदत करण्याचा सूचना दिल्या.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !