भुसावळ स्पोर्टस अ‍ॅण्ड रनर्सतर्फे रविवारी वॉकेथॉन


स्व.डॉ.श्रीकांत जिचकार यांच्या जयंतीनिमित्त उपक्रम : सहभागाचे आवाहन

भुसावळ- भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्स असोसिएशन व सिल्व्हर लाईन स्पोर्ट्सतर्फे स्व.डॉ.श्रीकांत जिचकार यांच्या जयंतीनिमित्त, रविवार, 15 रोजी पाच किलोमीटर अंतराच्या वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मैदानावरून सकाळी 6.45 वाजता वॉकेथॉनला सुरुवात होईल.स्व. श्रीकांत जिचकार यांचे सुत्र वापरून डॉ. जगन्नाथ दीक्षीत यांनी दोन वेळचे जेवण व 45 मिनिटे चालण्याची चळवळ संपूर्ण देशात सुरू केली आहे. त्यामुळे अनेक जणांना फायदा झाला असून मधुमेह मुक्त भारत निर्मितीसाठी डॉ. जिचकर यांची चळवळ यशस्वी ठरत आहे. या चळवळीच्या निमित्ताने डॉ. श्रीकांत जिचकार यांच्या जयंतीनिमित्त रविवारी 5 किमी चालण्याचा उपक्रम आयोजित केला आहे. सकाळी 6.45 वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदान येथून सुरुवात होईल. जामनेर रोडवरील हॉटेल हेवन जवळून यू-टर्न होऊन पुन्हा आंबेडकर मैदानावर परत आल्यावर स्पर्धेचा समारोप होईल.

यांची स्पर्धेला राहणार उपस्थिती
या कार्यक्रमास लडाख मॅरेथॉन पूर्ण करणारे प्रा.प्रवीण फालक, डॉ.तुषार पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. प्रसिद्ध स्पोर्ट्स फिजिओथेरपिस्ट डॉ.प्रियंका अय्यर देखील मार्गदर्शन करतील. सहभागी होण्याचे आवाहन उपाध्यक्षा डॉ. नीलिमा नेहेते, समन्वयक दीपेशकुमार सोनार यांनी केले आहे. दरम्यान, जगभरात 20 देशांमधील 194 शहरांमध्ये एकाचवेळी ही वॉकेथॉन आयोजित केली असून त्यात भुसावळ शहराची निवड झाली आहे, असे भुसावळ स्पोर्ट्स अ‍ॅण्ड रनर्सचे सचिव प्रा. प्रवीण पाटील यांनी कळवले आहे.


कॉपी करू नका.