खामगावात श्री विसर्जन मिरवणुकीला गालबोट : प्रचंड दगडफेक


खामगाव : लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांसह गणेशोत्सव मंडळांकडून गुरुवारी सायंकाळी मिरवणूक सुरू असतानाच दोन गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकार्‍यांमध्ये वाद उफाळल्याने सर्रास दगडफेक करून काचेच्या बाटल्या फेकण्यात आल्या. डीजे वाहनाचे काचही फोडण्यात आले असून काही युवक यात जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिस निरीक्षक सुनील अंबुलकर व सहकार्‍यांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे.


कॉपी करू नका.