धनाजी नाना महाविद्यालयाला ‘अ’ श्रेणी मिळाल्याने जल्लोष


माजी आमदार शिरीष चौधरींचाही जल्लोषात ठेका

फैजपूर- ऐतिहासिक भूमीत साकारलेले धनाजी नाना महाविद्यालयाला उत्तर महाराष्ट्र परीक्षेत्रात ‘अ’ श्रेणी मिळाल्याने बुधवारी सकाळी 10 वाजता महाविद्यालय परीसरात मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला. तापी परीसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालय नॅकच्या तिसर्‍या सायकलला 3.24 सीजीपीए मिळवून ‘अ’ प्राप्त करणारे उत्तर महाराष्ट्र परिक्षेत्रात अव्वल स्थान पटकावले आहे. याचा आनंदोत्सव बुधवारी सकाळी फटाक्यांची आतषबाजी करत बॅण्डच्या गाण्यावर जल्लोष साजरा करण्यात आला. या जल्लोषात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.पी.आर चौधरी यांच्या महाविद्यालयात आगमन होताच फटाक्यांची आतषबाजी करून त्यांना खांद्यावर उचलून गेट पासून ते कार्यालयापर्यंत आणण्यात आले. यात प्राध्यापक, प्राध्यापिका, विद्यार्थी, विद्यार्थिनी ,शिक्षकेतर कर्मचारी यांनी जल्लोष साजरा केला

माजी आमदार चौधरींनीही धरला ठेका
तापी परीसर विद्या मंडळाचे अध्यक्ष तथा माजी आमदार शिरीष चौधरी यांचे आगमन होताच फटक्यांची आतषबाजी करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या आग्रहस्त त्यांनी गाण्याच्या तालावर ठेका धरला विद्यार्थ्यांनी त्यांना खांद्यावर उचलून नाचले एकंदरीतच माजी आमदार शिरीष चौधरी यांनीही महाविदयलायला ‘अ’ श्रेणी मिळाल्याचा आनंदोत्सव साजरा केला.


कॉपी करू नका.