धुळ्यासह नंदुरबार जिल्ह्यात बर्ड फ्लूचे संकट


नवापूर : सुमारे 15 वर्षानंतर नवापूर तालुक्यात बर्ड फ्लूचे संकट उभे राहिल्याने पोल्ट्री व्यावसायीक संकटात सापडले आहेत. नंदुरबारसह धुळे, अकोला, बुलडाणा, नगर या जिल्ह्यातील पोल्ट्री फार्मच्या कोंबड्यांचा मृत्यू बर्ड फ्लूने झाल्याचा अहवाल शनिवारी सायंकाळी प्राप्त झाल्याने खळबळ उउाली आहे. रविवारपासून नवापुरातील नऊ लाख कोंबड्यांचे किलिंग ऑपरेशन सुरू होणार आहे. नवापूर तालुक्यातील 26 पोल्ट्री फार्ममध्ये साधारण नऊ लाख पक्षी असून त्यांची शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. पोल्ट्री फार्मवर पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

चिकन, अंडी विक्रीवर बंदी
पोल्ट्री फार्मचे अंडी, चिकन, पक्षी, पशुखाद्य आदी साहित्य पोल्ट्री फार्मच्या बाहेर जाणार नाही याची दक्षता घेण्यात येत आहे. बर्ड फ्लू संदर्भात 2006 ची परिीस्थिती लक्षात घेता सीमा भागांवर संचारबंदी लागू केली जाण्याची शक्यता आहे.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !