खटलापुरा घाटावर नाव उलटल्याने 11 गणेशभक्तांना जलसमाधी
भोपाळ : खटलापुरा घाट येथे गणपती विसर्जना दरम्यान नाव तलावात उलटून अकरा जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली तर या अपघातात पाच लोकांना वाचविण्यात यश आले. गुरुवरी सायंकाळी गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर भोपाळ येथील खटलापुरा घाटावर गणेश विसर्जन करत असतांना अचानक नाव उलटली. यामध्ये तब्बल 11 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. विसर्जनाकरता आलेल्या या नावेत एकूण एकोणीस लोक होते मात्र मुसळधार पावसामुळे तलावातील पाणी अचानक वाढले आणि ही दुर्घटना घडली. दरम्यान, दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये देण्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. पिपलानी येथील 1100 क्वार्टर येथे राहणारे काही लोक गणपती विसर्जनासाठी खटलापूरा घाट येथे आले होते. विसर्जनादरम्यान नावेत अधिक लोक असल्याने नावेच तोल जाऊन नाव उलटली.