लाचखोर मुख्याध्यापकाची भरली ‘शाळा’ : तीन हजारांची लाच घेताना एसीबीचा ट्रॅप


धुळे : 28 वर्षीय तक्रारदाराचे वडील शिपाई पदावरून सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांचा पेंशन प्रस्ताव धुळे शिक्षणाधिकारी कार्यालयात सादर करण्याच्या मोबदल्यात लाचेपोटी तीन हजार स्वीकारणार्‍या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक गुलाब नथू पिंजरी (55) यांना धुळे एसीबीच्या पथकाने बुधवारी दुपारी लाच स्वीकारताच अटक केल्याने शैक्षणिक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.

लाच स्वीकारताच केली अटक
तक्रारदाराकडून पेंशन प्रस्तावासाठी आरोपी मुख्याध्यापकाने आठ हजार रुपये लाचेची मागणी केली व त्यातील पहिल्या हप्त्यापोटी तीन हजार घेताना बुधवारी आरोपीला रंगेहाथ अटक करण्यात आली. .






यांनी केला सापळा यशस्वी
पोलिस उपअधीक्षक सुनील कुराडे यांच्या नेतृत्वात पोलिस निरीक्षक प्रकाश झोडगे, पोलिस निरीक्षक मनजितसिंग चव्हाण, संदीप सरग, राजन कदम, कृष्णकांत वाडीले, प्रशांत चौधरी, भूषण खलाणेकर आदींनी हा सापळा यशस्वी केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !