सातार्‍याच्या पोटनिवडणुकीत उदयराजेंविरोधात पृथ्वीराज चव्हाण उमेदवार राहण्याची शक्यता !


नवी दिल्ली : भाजपात प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांनी लोकसभा अध्यक्षांकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा सोपवला असून सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. सातार्‍यात उदयनराजेंविरुद्ध माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना उतरवले जाण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चांगलीच चुरशीची होण्याची चिन्हे आहेत. आघाडीच्या सध्याच्या समीकरणांनुसार सातार्‍याची जागा ही राष्ट्रवादीच्या वाट्याला येते त्यामुळे राष्ट्रवादी ही जागा सोडायला तयार होणार का, हा प्रश्नही अनेकांना पडला आहे मात्र काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी या संदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेच्या तिकीटावर उदयनराजेंविरोधात निवडणूक लढवली होत. मात्र आता उदयनराजे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे शिवसेना ही जागा त्यांच्यासाठी सोडतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे नरेंद्र पाटील अपक्ष निवडणूक लढतील, असेही सांगितले जात आहे. परीणामी सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक चांगलीच रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.


कॉपी करू नका.