यावलमधील तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
यावल- शहरातील दानिश सादीक पटेल (18) या तरुणाने फिनाईल प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना मंगळवारी सकाळी घडली. यानंतर लागलीच त्याच्यावर रुग्णालयात डॉ. मंगेश मेढे, प्रियंका मगरे, पुनम राऊत, संजय जेधे, पिंटू बागुल आदींनी उपचार केले व पुढील उपचारार्थ त्यास जळगाव हलवण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.