स्वस्त धान्याची काळ्या बाजारात विक्री : वाहनाला पकडताच पोलिसांना मारहाण
शहादा : स्वस्त धान्य दुकानातील गोर गरीबांच्या रेशनिंगच्या तांदूळ काळा बाजारात विक्रीसाठी नेत असताना तालुक्यातील पिंगाने गावा लगत 1 रोजी पहाटे सुमारे 2.30 ते 3 वाजेच्या सुमारास पोलीस प्रशासनाने वाहन थांबून संबंधित व्यक्तीस विचारपूस केली असता त्या व्यक्तीने गैरमार्गाने पाच ते सहा व्यक्तींना बोलून पोलीस कर्मचार्यांना मारहाण केली शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून चालकासह सात लोकांविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केले म्हणून शहादा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सुमारे सात हजार सातशे तीस रुपये किंमतीचा रेशनिंगच्या एक हजार 546 किलो तांदूळ व नऊ लाखाांचे दोन वाहन मिळूनप लाख सात हजार 730 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.पोलिस प्रशासनाच्या या कारवाईने काळा बाजारात विक्री करणार्या रेशनिंगच्या व्यवसायामध्ये धाबे दणाणले. कारवाई शहादा पोलिस निरीक्षक दिपक बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
गोपनीय माहितीनुसार कारवाई
शहादा तालुक्यातील पाडळदा परीसरातून एका स्वस्त धान्य दुकानातून रेशनिंगच्या तांदूळ हा तळोदाकडे जाणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर शहादा उपविभागीय पोलिस श्रीकांत घुमरे व शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी ि1 मे च्या मध्यरात्री पासूनच पाडळदा त. भादा रस्त्यावर पिंगाने गावालगत पोलिसांच्या बंदोबस्त लावण्यात आला. 1 मे च्या मध्य पहाटे सुमारे अडीच ते तीन वाजेच्या सुमारास पाडळदा चौफुली कडून पिंगाने पुलावरून आयशर वाहन (क्रमांक एम एच. 39.डब्ल्यू 0194) येत असतांना गस्तीवर असलेल्या पोलीस कर्मचार्यांना आढळून आले. त्यांनी ते वाहन थांबून विचारपूस केली असता वाहनात बसलेल्या चालकाच्या बाजूस एका युवकाने पोलीस कर्मचार्यांशी हुज्जत घातली. कर्मचार्यांनी वाहन सोडले नाही म्हणून त्या युवकाने तळोदा तालुक्यातून काही गैरकायद्याची पाच ते सात लोकांना बोलावत पोलीस कर्मचार्यास मारहाण करून त्याच्या हाताला दुखापत केली. यावेळेस पाच ते सात लोकांनी बंदोबस्तसाठी असलेल्या पोलीस कर्मचार्यांना माहराण केली. गैरमार्गाने तांदूळ घेऊन जाणार्या व्यक्ती पोलीस प्रशासनाच्या सूचना न ऐकता दादागिरी करून तो तांदूळ नेण्याच्या प्रयत्न करीत असताना मात्र पोलिस प्रशासनाने शहादा पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत पोलीस उपनिरीक्षक निलेश वाघ यांच्याशी संपर्क करत त्वरित पोलिसांना पाचारण करताच संशयीतांना अटक करण्यात आली. आरोपींनी आणलेले वाहन झायलो (क्रमांक एम.एच. 39 डी.2122) या वाहनांतून गैरमार्गाचा लोक आल्याने तांदूळ असलेली वाहन आयसर व झायलो असे दोन वाहन पोलिस प्रशासनाने जप्त केल्या.





या आरोपींना अटक
या संदर्भात शहादा पोलिसात पोलीस कर्मचारी भरत पुंडलिक उगले यांनी फिर्याद नोंदवल्याने सात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपी दीपक मनोहर कलाल (गणपती गल्ली, तळोदा), योगेश दशरथ पाटील (24, तळोदा), अशोक शनू वाडीले, सुनील अशोक वाडीले (दोघे रा.जुनी पोस्ट गल्ली, शहादा), धानका दलपुर, जगन तुकाराम सोनवणे व प्रवीण धानका दलपुर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
