उत्तर महाराष्ट्रासह भुसावळात धूम स्टाईल मंगळसूत्र लांबवणारा भामटा जाळ्यात


चोरीचे सोने विकत घेणाराही जाळ्यात : 14 गुन्ह्यांची कबुली : गुन्हे शाखेची धडक कारवाई : दोन साथीदार मात्र पसार

जळगाव : रस्त्याने पायी चालणार्‍या महिलांच्या गळ्यातील चैनसह मंगळसूत्र धूम स्टाईल लांबवून पोलिसांची डोकेदुखी वाढवणार्‍या अटल आरोपीच्या जळगाव गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. आरोपीने भुसावळ शहर व बाजारपेठ पोलिस ठाणे हद्दीसह मालेगाव, लासलगाव, शिरपूर, नंदुरबार, चाळीसगाव शहर, निफाड व सिन्नर पोलिस ठाणे हद्दीत तब्बल 14 गुन्हे केल्याची कबुली दिली आहे. आरोपी गुन्हा केल्यानंतर परळी वैजनाथ येथे नातेवाईकांकडे वास्तव्य करीत मात्र पुन्हा वातावरण निवळताच गुन्हा करीत असत. या प्रकरणी तौफिक हुसेन जाफर हुसेन (18, रा.खानका मदरसा जवळ, भुसावळ) यास अटक करण्यात आली तर त्याचे साथीदार सोहेल अली युसूफ अली (इराणी मोहल्ला, भुसावळ) व अरबाज अली युसूफ अली (इराणी मोहल्ला, भुसावळ) हे पसार झाले. दरम्यान, आरोपी तौफीकने चोरीचे भुसावळातील हरीचंद्र दत्तात्रय इखणकर (25, भुसावळ) यास विकल्याची कबुली दिल्यानंतर त्यास अटक करण्यात आली तसेच त्याच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आली. याबातची माहिती जळगाव जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांनी घेतलेल्या पत्रकार परीषदेत दिली.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जिल्ह्याततील वाढत्या चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची उकल करण्याकामी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना करण्यात आल्या होत्या. त्याकामी स.फौ.अशोक महाजन, शरीफ काझी, युनुस शेख, किशोर राठोड, रणजित जाधव, विनोद पाटील, सचिन महाजन, योगेश वराडे, पो.हे.कॉ. महेश महाजन, वसंत लिंगायत, इंद्रीस पठाण, मुरलीधर बारी, अशोक पाटील यांचे पथक तयार करण्यात आले होते. भुसावळ शहरातील तौफिक हुसेन जाफर हुसेन व सोहेल अली युसुफ अली हे दोघे जण जळगाव जिल्हयासह संपुर्ण महाराष्ट्रात चैन स्नॅचिंगचे गुन्हे करत असल्याची माहिती मिळताच आरोपी तौफिक हुसेन जाफर हुसेनच्या मुसक्या आवळताच त्याने गुन्ह्यााची कबुली दिली.






14 गुन्ह्यांची कबुली
आरोपी तौफिकने दिलेल्या कबुलीनुसार भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन हद्दीतील दोन व भुसावळ शहर पोलिस स्टेशन हद्दीतील एक अशा एकुण तीनन गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपींनी मालेगाव, लासलगाव, निफाड, सिन्नर (नाशिक जिल्हा), शिरपूर (धुळे जिल्हा), नंदुरबार, चाळीसगाव येथे चैन स्नॅचिंगचे गुन्हे साथीदार सोहेल अली युसूफ अली (इराणी मोहल्ला, भुसावळ) व अरबाज अली युसूफ अली (इराणी मोहल्ला, भुसावळ) हे पसार झाले.

आरोपींनी येथे केले धूम स्टाईल गुन्हे



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !