भाजपचे प्रदेशाध्यक्षांनी दिलेली धमकी म्हणजे भाजपाने लोकशाहीमधील सोडल्या राजकीय मर्यादा
मंत्री भुजबळांच्या धमकीचा राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केला निषेध
भुसावळ : भाजप प्रदेशाध्ययक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘तुम्ही जामिनावर सुटलेला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत त्यामुळे तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल’ असे वक्तव्य करणे म्हणजे ही एक प्रकारचे धमकी असून हा प्रकार निषेधार्थच असल्याचे राष्ट्रवादी ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय जनतेला कोरोना महामारीमधून बाहेर काढण्याऐवजी, केवळ पश्चिम बंगालची सत्ता मिळविण्यासाठी संपूर्ण देशाला वेठीस धरले, देशाच्या आरोग्यव्यवस्थेकडे दुर्लक्ष करून पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचा धुराळा उडवल्याने यावर जगभरातुन प्रचंड प्रमाणावर टिका झाल्याचेही नेमाडे कळवतात.
भाजपाकडून गुंडगिरीचा स्वीकार
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांनी सुरूवातीपासुनच या निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांना पाठींबा दिलेला होता. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वतीने व त्यांच्या सर्व जेष्ठ नेत्यांनी ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन करून प्रतिक्रिया दिल्यात. त्याच प्रमाणे ममता बॅनर्जी यांचे निवडणुकीतील त्यांच्या पक्षाच्या यशाबाबत, अभिनंदन करून, झाशीच्या राणीप्रमाणे जिद्दीने लढुन हा एकहाती विजय मिळविला, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ ओबीसी नेते व मंत्री छगन भुजबळ यांनी दिली होती. मात्र चंद्रक्रांत पाटील यांनी हुकुमशहाच्या तोर्यात भुजबळ यांना जी धमकी दिली, त्यावरून भाजपाने लोकशाहीमधील राजकीय मर्यादा सोडल्या असल्याचे नेमाडे म्हणाले. संपूर्ण देशभरात भाजप विरोधात लाट तयार झाल्याची जाणीव भाजपेयींना झाली आहे. महाराष्ट्रातील जनता याचा वचपा भाजपकडुन घेतल्याशिवाय राहणार नाही, असेही नेमाडे यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.


चंद्रकांत पाटील तर लबाड नेतृत्व
चंद्रकांत पाटील यांनी भुजबळ यांना जी धमकी दिली हे भाजपच्या सडक्या मनोवृत्तीचे प्रतीक आहे. चंद्रकांत पाटील हे राजकारणातील विश्वासघाती व्यक्तिमत्त्व आहे, जळगांव जिल्ह्याचे नेते आदरणीय नाथाभाऊ खडसेंनी राजीनामा दिल्यानंतर पाटील पालकमंत्री झाले. तेव्हा रामाच्या पादुका सांभाळणार असल्याचे वक्तव्य यांनी केले मात्र तिकडे नाथाभाऊंना फसवण्याचा प्रयत्न करत होते. अशा लबाड माणसाला कोल्हापूर करांनीही नाकारल्याची टिका नेमाडेंनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी याबाबत महाराष्ट्राची व भुजबळ साहेबांची जाहीर माफी मागावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे जळगाव जिल्हाध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केलेली आहे.


