निधन वार्ता : श्रावण ठाकूर
भुसावळ :एम.ओ.एच.कॉलनी, हिरानगर भागातील रहिवासी श्रावण दामू ठाकूर (76) यांचे 7 रोजी सकाळी 7.10 वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. ते नागपूर जिल्ह्यातील केळवद पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक दिलीप ठाकूर यांचे वडील तर रमेश ठाकूर यांचे काका व भुसावळ भाजपा युवा मोर्चाचे सचिव राजकुमार ठाकूर यांचे आजोबा होत. त्यांच्या पश्चात मुलगा, चार मुली, नातवंडे असा परीवार आहे.


