कोळवदच्या शेतकर्‍याकडे खंडणी मागितल्याप्रकरणी एकाविरुध्द गुन्हा


यावल : तालुक्यातील कोळवद येथील एका शेतकर्‍याला तुला वनविभागाच्या गुन्ह्यांमध्ये अटकवुन टाके तसेच तुला जीवे ठार मारेल अशा प्रकारच्या धमक्या देऊन त्याच्याकडून 93 हजाराची खंडणी घेतल्या प्रकरणी एकाविरूध्द शनीवारी यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. मुबारक नबाब तडवी (रा.परसाडे) असे आरोपीचे नाव आहे. अरुण टोपा महाजन (रा.कोळवद) हे शेती करतात. शेतात सतत ये-जा करत असताना त्यांची मुबारक नबाब तडवी (रा.परसाडे) याच्यासोबत ओळख झाली. मुबारक तडवी याने अरुण महाजन यांना हळूहळू धमकी द्यायला सुरुवात केल तसेच तुमच्या शेतामध्ये अवैधरीत्या लाकूड टाकून तुमच्याविरुद्ध वन विभागात गुन्हा दाखल करायला लावेल, असे सांगून त्यांच्याकडून वारंवार पैशाची मागणी करत गेला. घाबरलेल्या अवस्थेत शेतकर्‍याने त्याला आजपावेतो तब्बल 93 हजार रुपये दिले. त्याने पुन्हा त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली असता, घाबरलेल्या अवस्थेत सगळा प्रकार आपल्या भावास सांगितला. दरम्यान, दोघां भावांनी शनिवारी यावल पोलिस स्टेशन गाठत संबंधितांविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, सहाय्यक फौजदार नेताजी वंजारी, हवालदार महेबुब तडवी, शिकंदर तडवी करीत आहे.


कॉपी करू नका.