‘लोकमत’चे कार्यकारी संपादक मिलिंद कुलकर्णी यांना पितृशोक
शिस्तप्रिय व विद्यार्थीप्रिय शिक्षक मधुकर कुलकर्णी यांचे निधन : आज अंत्ययात्रा
नाशिक : दैनिक ‘लोकमत’च्या नाशिक आवृत्तीचे कार्यकारी संपादक मिलिंददादा कुलकर्णी यांचे वडील तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक व मूळचे यावल येथील रहिवासी मधुकर बळवंत कुलकर्णी (84) यांचे बुधवार, 19 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा नाशिक येथील सिडकोतील आर्यावर्त रेसीडन्सीपासून गुरुवार, 20 रोजी सकाळी सात वाजता निघेल व मोरवाडीतील अमरधाममध्ये पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील. स्व.मधुकर कुलकर्णी हे शिस्तप्रिय व विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून परीचीत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे असा परीवार आहे.


