धडक कारवाई करा, अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घ्या


प्रांताधिकारी रामसिंग सुलाने यांच्या भरारी पथकाला सूचना

भुसावळ – आदर्श आचारसंहिता लागु झाल्यानंतर सोमवारी भुसावळ प्रांताधिकारी कार्यालयात आचारसंहितेच्या अंमलबजावणीकरीता नियुक्त करण्यात आलेल्या पथकांची बैठक झाली. यात पथकांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी प्रांतधिकारी रामसिंग सुलाने, पालिका मुख्याधिकारी करुणा डहाळे, तहसीलदार दीपक धीवरे, डीवायएसपी गजानन राठोड यांनी मार्गदर्शन केले. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या भरारी पथकांना प्रांताधिकारी सुलाने यांनी धडक कारवाई करण्यासह कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याचीदेखील खबरदारी घ्यावी, अशी सूचना केली.


कॉपी करू नका.