निंभोरा सेंट्रल बँकेत आठ दिवसांपासून लिंक बंद : कोट्यवधींचे व्यवहार ठप्प


निंभोरा- गावातील सेंट्रल बँकेत आधीच कमी कर्मचार्‍यांवर काम चालवत असतांना गेल्या तीन महिन्यात अनेकदा लिंक बंद असल्यामुळे बँक ग्राहकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. किमान 70 ते 80 कोटींवर व्यवहार असलेल्या बँकेत बीएसएनएल च्या लिंकवर अवलंबून रहावे लागत असून वारंवार बीएसएनलची वारंवार नेट कनेक्टिव्हिटी बंद पडत असल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. गेल्या तीन महिन्यात असे प्रकार वाढत असल्याने या बँकेत नेट व वीज व्यवस्थेबाबत तातडीने बदल करणे गरजेचे आहे.

सोमवारीदेखील ग्राहकांना मनस्ताप
बँकेतील यूपीएसद्वारे काम सुरू असताना यूपीएस बंद पडले मात्र वीज व्यवस्था सुरळीत झाल्यावर लेजर बंद पडले व त्यामुळे व्यवहार होऊ शकले नाही.दुसर्‍या दिवशी दिवसभर नेट बंद असल्याने लिंक बंदमुळे वयवहार ठप्प राहिले मात्र खेड्या-पाड्यातून येणार्‍या व वयोवृद्धव् ग्राहकांना होणार्‍या त्रासास जबाबदार कोण? असा प्रश्‍न आहे. बीएसएनएल, वीज कंपनी, बँक प्रशासन या त्रिकुटातील त्रृटींमुळे ग्राहक मात्र भरडला जात असताना बँक प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे. वारंवार नेटची समस्या येत असताना कोट्यवधींचे व्यवहार होणारी सेंट्रल बँक साधे खाजगी कंपनीचे नेट कनेक्शन का ठेवू शकत नाही? असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. एक-दोन कर्मचार्‍यांवर मोठे कार्यक्षेत्र असलेल्या बँकेने ग्राहकांना वेठीस धरले आहे. त्यातच एका कर्मचार्‍याला दोन दिवस चोपडा व दोन दिवस शिरसोली आशा पद्धतीने काम देऊन दोनच दिवस निंभोरा बँकेत देण्यात आले आहेत त्यामुळे कृषी कर्जासह अन्य बँकींग कामे करण्यासाठी ग्राहकांना मनस्ताप होत आहे. या बँकेत एखाद्या दिवशी ग्राहकांचा उद्रेक होईल ? अशी चिन्हे आहेत.सोमवारीदेखील सकाळी लिंक बंद आहे असे समजल्यावर ग्राहकांनी संताप व्यक्त केला.


कॉपी करू नका.