भुसावळकरांवर पुन्हा ओढवले जलसंकट


भुसावळ : आठवड्याभरापूर्वी शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाल्यानंतर पुन्हा आता भुसावळकरांवर जलसंकट ओढवले आहे. मंगळवारी दुपारी जलशुद्धीकरण केंद्रातील ट्रान्सफॉर्मर दुसर्‍यांदा फेल झाल्याने शहरवासींयाना पुन्हा दोन दिवस पाणीपुरवठा होणार नसल्याने त्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. पाणीपुरवठा योजनेवरील जलशुद्धीकरण केंद्रातील 500 केव्हीएचा ट्रान्सफॉर्मर 14 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजता बंद झाला होता. यामुळे ऐन पावसाळ्यात टंचाई निर्माण झाली तर पालिकेने स्टँडबाय 400 केव्हीचा ट्रान्सफॉर्मर रॉ वॉटरला बसवून तेथील 500 केव्हीएचा ट्रान्सफॉर्मर प्युअर अर्थात जलशुद्धीकरण केंद्रात बसवला होता. दहा दिवस हा ट्रान्सफॉर्मर कार्यान्वित राहिल्यानंतर त्यात पुन्हा मंगळवारी दुपारी 2 वाजेच्या सुमारास बिघाड झाला. यामुळे शहराचा पाणीपुरवठा पून्हा दोन दिवस बंद राहणार आहे.


कॉपी करू नका.